भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद ‘टाईम’च्या १०० उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत

मुंबई : बुधवारी ‘टाईम’ची २०२१ सालची ‘१०० नेक्स्ट’ यादी जाहीर झाली यात भीमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Bhim Army’s Chandrasekhar Azad) यांचा समावेश आहे. ‘टाईम’ (Time’s list) उज्ज्वल भविष्य घडविणार्‍या १०० उदयोन्मुख नेत्यांची नावे पुरस्कृत करते.

या यादीत ट्विटरच्या प्रमुख वकील विजया गड्डे, युनाइटेड किंगडमचे अर्थमंत्री ऋषी सुनक, इन्स्टाकार्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता, डॉक्टर आणि ‘गेट अस पीपीईच्या’ कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि अपसॉल्व्हचे संस्थापक रोहन पावुलुरी या भारतीय वंशाच्या व्यक्तींचाही समावेश आहे.

आझाद हे दलितांना शिक्षणाच्या माध्यमातून दारिद्र्यातून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी शाळा चालवतात आणि जातीआधारीत हिंसाचाराच्या बळींच्या बचावासाठी मोटारसायकलवरून खेडोपाड्यात जावून भेदभावाविरूद्ध प्रात्यक्षिके करतात, असे त्यांच्याबद्दल टाईम मासिकाच्या प्रोफाइलमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER