देशाच्या राजाची गादी कायम राहील, पृथ्वीवर येणार मोठे संकट; भेंडवळचे भाकीत

Maharashtra Today

बुलडाणा : शेती, राजकारण आणि अन्य वार्षिक भविष्यासाठी विदर्भात प्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या घट मांडणीच्या भाकितात (Bhendwal-ghat-Mandani-bhavishyavani)पावसाव्यतिरिक्त देशाच्या राजाची गादी कायम राहणार, पृथ्वीवर मोठे संकट येईल, जगात आर्थिक टंचाई भासेल असे म्हटले आहे. यात पृथ्वीवर मोठे संकट येईल, याचा अर्थ कोरोनाशी (Corona)जोडला जातो आहे.

ही घट मांडणी अक्षय्यतृतीयेच्या एक दिवस आधी करून अक्षय्यतृतीयेला भाकीत घोषित करण्यात येते. हे भाकीत ऐकण्यासाठी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खांदेश या भागातून शेतकरी येतात. ३५० वर्षांपूर्वी तपस्वी चंद्रभान महाराज वाघ (Chandrabhan Maharaj Wagh)यांनी ही परंपरा सुरू केली होती, त्यांचे वंशज ती पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकीत घोषित केले.

महत्त्वाचे

यावर्षी जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात चांगला पाऊस होणार असून, ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल. अकाळी पाऊस कमी होईल. पृथ्वीवर मोठे संकट येईल, जगात आर्थिक टंचाई भासेल. देशाच्या राजाची गादी कायम राहणार आहे मात्र राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल. देशाच्या प्रधानावरही संकट आहे. देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव आणि ताण राहणार असून घुसखोरीचा उपद्रव जास्त राहील.

कापूस ,ज्वारी, मूग ही अशी पीक चांगले येतील. भाव ही चांगला मिळेल. तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण भाव राहणार नाही.

सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षीही रोगराई जास्त असणार आहे. कोरोना सारख्या महामारीतून दिलासा मिळण्याची यावर्षभरात तरी शक्यता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button