भेंडीबाजार : एकेकाळी दाऊद इब्राहिम राहात असलेल्या इमारतीच्या पुनर्विकासावर स्थगिती; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

dawood & SC

मुंबई : दाऊद इब्राहिम एकेकाळी राहात असलेल्या मुंबईच्या भेंडीबाजारातील इमारत हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखानाच्या पुनर्विकासावर स्थगिती देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. भेंडीबाजारातील देशातील सर्वांत मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलेल्या सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टच्या (एसबीयूटी) पुनर्विकासाच्या योजनेला हा सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने महाराष्ट्र राज्य वक्फ्स (एमएसबीडब्ल्यू) द्वारे ११,००० चौरस फूट विक्रीविरुद्ध युक्तिवाद करणार्‍या विशेष रजा याचिकेवर (एसएलपी) सुनावणी केली होती. एसबीयूटीची प्रॉपर्टी आणि त्या प्रस्तावित पुनर्विकासाच्या कारणास्तव परिसर हा वक्फ मालमत्ता आहे आणि विक्री करता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER