भय्यू महाराजांच्या गाडीवर ठेवली जात होती नजर; सेवेकऱ्याने दिली माहिती

Bhaiyyu Maharaj

इंदूर : आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांची गाडी कुठे जाते यावर लक्ष ठेवले जात होते. त्यांच्या गाडीत ‘जीपीआरएस ट्रॅकर’ लावले होते, अशी माहिती महाराजांचा सेवेकरी आणि गाडीचा चालक कैलास पाटील याने दिली. कैलास पाटील याचा १२ मार्च रोजी फिर्यादीच्या वकिलांनी दुसऱ्यांदा जबाब घेतला. त्याने सांगितले की, महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावली होती. गाडी कुठे जाते याची माहिती ठेवली जात होती. महाराजांची पत्नी आयुषी गाडीत महाराजांसोबत जाणाऱ्या सेवेकऱ्याला पुन्हा-पुन्हा एकच गोष्ट विचारत असे, की त्यांच्यासोबत कोण-कोण आहे.

सानिया सिंह नावाची एक मॉडेल आणि अभिनेत्री महाराजांना भेटायला इंदौरला येत असे. तिचे  जेवण महाराजांकडे लपूनछपून पाठवले जात होते. महाराष्ट्राच्या एका संस्थेवर कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होता. वर्षा नावाच्या महिलेने मुलताईमध्ये कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली होती. महाराजांच्या काही जवळच्या लोकांनी हा सौदा केला होता.आयुषी आणि कुहू (महाराजांची कन्या) यांच्यात सतत भांडणे होत होती. त्यामुळे महाराज तणावात असायचे. आरोपी विनायक आणि शरद हे महाराजांचे विश्वासू सेवेकरी होते. घटनेच्या तीन महिने आधी महाराजांनी मला कुहूची गाडी चालवण्यासाठी पुण्याला पाठवले होते.

सहा महिन्यांत सुनावणी संपवा- आदेश

या प्रकरणात आतापर्यंत २५ पेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातून सहा महिन्यांत सुनावणी संपवण्याचा आदेश आला आहे. यानंतर सुनावणीला वेग आला आहे. पुढील सुनावली १५ मार्च रोजी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER