भारतीय वंशाच्या भाव्या लाल नासाच्या कार्यकारी प्रमुख

Nasa & Bhavya Lal

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांची अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) कार्यकारी प्रमुख झाल्या आहेत. भाव्या लाल अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन द्वारा नासामध्ये बदलासंबंधी समीक्षा दलाच्या सदस्य आहेत. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या आणि नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.

भाव्या लाल यांनी न्युक्लिअर सायन्स मध्ये बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसीमध्ये मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली आहे. तर जॉर्ज वाशिंग्टन युनिव्हर्सिटीतून सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक प्रशासनात डॉक्टरेट मिळवली आहे.

भाव्या यांनी स्पेस टेक्नोलॉजी क्षेत्रामध्ये दीर्घकाळ काम केले आहे. एसटीपीआयमध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी- सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. केम्ब्रिज, मॅसाचुसेट्समध्ये एबट एसोसिएट्स इंकमध्ये सेंटर फॉर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पॉलिसी स्टडीजच्या संचालक म्हणून कार्यरत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER