शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांनंतर भावजय पल्लवी कौस्तुभ आमटेंचे स्पष्टीकरण

Sheetal Amte.jpg

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे करजगी (Dr Sheetal Amte Karjagi) यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या सासू-सासऱ्यांनी फेसबुकवरून आमटे कुटुंबीयांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर शीतल यांची सख्खी भावजय पल्लवी कौस्तुभ आमटे (Pallavi Kaustubh Amte) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

करजगी आणि आमटे हे दोन्ही परिवार दुःखात आहेत. काळच प्रश्नांची उत्तरं देईल, अशी प्रतिक्रिया पल्लवी आमटेंनी दिली. जे काही घडलं, ते आमच्या परिवारासाठी फार दुर्दैवी आहे. यातून आम्हाला सावरायला खूप वेळ लागणार आहे. डॉ. शीतल आमटे अत्यंत बुद्धिमान आणि गुणवत्तादायी होत्या. त्यांनी जी स्वप्नं पाहिली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, त्या दिशेने काम करत राहू, अशी प्रतिक्रिया पल्लवी आमटे यांनी दिली.

शीतल आमटे यांच्या आत्महत्याप्रकरणी जी चौकशी सुरू  आहे, त्यातून सगळं समोर येईल. मात्र या नुकसानातून सावरायला आम्हाला वेळ लागणार आहे. आमटे परिवारावर आलेलं हे मोठं अरिष्ट आहे. आम्ही यातून हळूहळू बाहेर येऊ. आनंदवनासोबत समाज जसा नेहमी उभा राहिला, तसाच आमच्यासोबत राहील, अशी आशाही पल्लवी आमटेंनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER