जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक भाऊ लोखंडे यांचे निधन

Bhau Lokhande passed away.jpg

जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे (७८) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. सामाजिक, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध दलित साहित्याच्या चळवळीत त्यांनी मोठे आहे. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता.

भाऊ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रिडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. त्यांनी अनेक संस्थ्यांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर डॉ. भाऊ लोखंडे यांनी पीएचडी साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तकही लिहिले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन कार्याला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.

भाऊ लोखंडे यांची पुस्तके :

  • – अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
  • – डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा (पारिजात प्रकाशन, कोल्हापूर – २०१२)
  • – मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव
  • – महाकवी अश्वघोषरचित बुद्धचरित
  • – रशियातील बौद्धधर्म – सौन्दरनन्द महाकाव्यम्
  • – डॉ. आंबेडकरी बावीस प्रतिज्ञा
  • – बौद्धांचे सण उत्सव आणि मानसिकता
  • – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना उपदेश; मार्गदर्शन व शिक्षण विषयक विचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER