मोदी झोपतात तेवढा वेळ तरी ठाकरेंनी काम करावे ! संजय राऊतांना भातखळकरांचा टोमणा

Atul Bhatkhalkar-Sanjay Raut

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काम करण्याची पद्धत सारखीच आहे, असे म्हणून शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे आणि मोदी यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी, उद्धव ठाकरेंनी काम करावे असे सुचवताना राऊतांना टोमणा मारला – मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावे! महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होते आहे. प्रशासकीय यंत्रणा कोसळली आहे, अशी टीका विरोधी पक्ष करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघत नाहीत. काम करत नाहीत. अशी टीका करताना विरोधी पक्ष ठाकरेंना ‘मातोश्री’च्या बाहेर कधी निघणार? असा बोचरा प्रश्न विचारत आहेत. यानंतर नेहमीप्रमाणे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या बचावतात उतरले. ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरीची तुलना करताना म्हणाले – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत सारखीच आहे.

ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेवत असतात, असे म्हणून उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याबद्दल टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून – नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरेंनी तेवढा वेळ तरी काम करावे, असा टोमणा मारला. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले की, “कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात.

बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजींना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER