
मुंबई : मुंबईमध्ये सात ठिकाणी मलजल पम्पिंग केंद्र उभारून मलजलावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होईल. मात्र पालिकेतील अकार्यक्षम सत्ताधारी शिवसेनेमुळेच हा प्रकल्प रखडला, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी काल (शुक्रवारी) केला. काँग्रेस महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटकपक्ष आहे. यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला – दुभत्या म्हशीच्या लाथा गोड.
मुंबई मनपाच्या (Mumbai Mahanagarpalika) पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तेत सोबत असलेल्या मित्रपक्षाच्या नेत्याकडून शिवसेनेवर आरोप करण्यात आल्याने काँग्रेस-शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.
अतुल भातखळकर यांनी ट्विट केले – “जो मलजल प्रक्रिया प्रकल्प २०१७ ला पूर्ण होणे अपेक्षित होते, त्याचे काम शिवसेनेच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजूनही सुरू झालेले नाही. हरित लवादाने महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचे आहेत… दुभत्या म्हशी च्या लाथा गोड.”
जो मलजल प्रक्रिया प्रकल्प २०१७ ला पूर्ण होणे अपेक्षित होते त्याचे काम शिवसेनेच्या आर्थिक हितसंबंधांमुळे अजूनही सुरू झालेले नाही. हरित लवादाने महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे घणाघाती आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांचे आहेत… दुभत्या म्हशी च्या लाथा गोड. pic.twitter.com/ovsLoPx739
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2021
मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर उल्लेखित टीका केली. पत्रपरिषदेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा उपस्थित होते.
महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे नूतनीकरण जे ३ वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते ते आज १२ वर्षांनंतर देखील पूर्ण झालेले (केलेले) नाही. अपेक्षित खर्च ८५ कोटींवरून ११९ कोटी इतका वाढला (वाढवला) आहे… टक्केवारीसाठी सर्वकाही… pic.twitter.com/wohMrNygNV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2021
टक्केवारीसाठी
“महापालिकेच्या विस्तारित इमारतीचे नूतनीकरण जे ३ वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते ते आज १२ वर्षांनंतर देखील पूर्ण झालेले (केलेले) नाही. अपेक्षित खर्च ८५ कोटींवरून ११९ कोटी इतका वाढला (वाढवला) आहे… टक्केवारीसाठी सर्वकाही… ” असे देखील भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. महापालिकेच्या मुख्यालयाच्या नूतनीकरण खर्चात ३९ टक्के वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला