सनराइजच्या आगीतील मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी, भातखळकरांची टीका

Bhatkhalkar on shivsena over fire at Sunrise Hospital in Bhandup

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात (Dreams Mall Sunrise Hospital in Bhandup) लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला. या रुग्णालयाच्या वैधतेवर टीका करताना भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर म्हणालेत, सनराइजच्या आगीतील मृत्यू हे शिवसेनेच्या (Shivsena) टक्केवारीचे बळी आहेत.

भातखळकर (Bhatkhalkar) यांनी ट्विट केले – “शिवसेनेचे निकटवर्तीय असलेल्या PMC बँक घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच महापालिकेचा भांडुपच्या ड्रीम मॉलला वरदहस्त आहे काय?’ मॉलमधील अनधिकृत सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी आहेत.”


पीएमसी बँकेतील घोटाळ्यात संबंध असलेल्या वाधवान कुटुंबाचा अनधिकृत सनराईझ हॉस्पिटलशी थेट संबंध असून त्याच्यामुळेच शिवसेनेने या हॉस्पिटलला ओसी नसताना मंजुरी देण्याची कृपा केली आहे. टक्केवारीच्या मोहापायी १० लोकांचा बळी गेला.

मॉलमध्ये हॉस्पिटल याआधी कधीच पाहिले नाही! किशोरी पेडणेकर

मॉलमध्ये हॉस्पिटल पहिल्यांदाच पाहिले! कारवाई होणार असा इशारा देणाऱ्या महापौर किशोरीताईंनी डोळे उघडे ठेवून मुंबईत एक फेरफटका मारावा, आपल्या नाकाखाली आपल्याच मंडळींनी केलेले असे बरेच उपद्व्याप त्यांना पहिल्यांदाच बघायला मिळतील, असा टोमणा भातखळकर यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER