लॉकडाऊन लागले तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू ; भरत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली ‘ही’ विनंती

CM Uddhav Thackeray - Bharat Jadhav - Maharashtra Today

मुंबई : राज्यात पुन्हा कोरोनाचे (Corona) संकट वाढत चालले आहे . या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे देशातील सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सिनेक्षेत्रातलाही मोठ्या प्रमाणात लाॅकडाऊनचा फटका बसला. जानेवारी उजाडला तरी राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे उघडली नव्हती. त्यानंतर अभिनेत्यांनी विविध माध्यमातून मागणी केल्यानंतर सरकारने ५० टक्के क्षमतेने सिनेमागृहे चालू केली होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येईल अशी चिंता कलाकारांना सतावत आहे. त्यामुळे मराठी सिनेअभिनेता भरत जाधव यांनी लाॅकडाऊन न करण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असं संकट कोसळू नये. नाटक आज पूर्णपणे सावरलं नाही. अशात पुन्हा त्याचा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेल. त्याचा थेट परिणाम आमच्या उपजीविकेवर होतो. आता राज्य सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती आहे, असे भरत जाधव म्हणाले.

कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लॉकडाऊन (Lockdown) करू नका, अशी विनंती आधीदेखील केली होती. परंतु कोरोना प्रसार वाढत असेल तर लाॅकडाऊन करावाच लागेल. जर हा निर्णय घ्यावाच लागलाच तर नाट्यक्षेत्राला यातून वगळावं अशी विनंती आम्ही सर्व कलाकार जाऊन मुख्यमंत्र्यांना करणार आहोत, अशी माहिती भरत जाधव (Bharat Jadhav) यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button