भारत बायोटेकच्या इंट्रानेसल वॅक्सीनला क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी

Bharat Biotech - Intra Nasal Covid Vaccine

नवी दिल्ली : सरकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही वॅक्सिन (Vaccine) यशस्वी ठरली, तर ती कोरोना (Corona) विरूद्धच्या लढाईमधील मोठा गेम चेंजर ठरणार आहे. भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) इंट्रानेसल वॅक्सीनला (Intranasal Vaccine) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकने नाका वाटे दिल्या जाणाऱ्या लसीवर संशोधन सुरू केले आहे. भारत बायोटेकच्या इंट्रानेसल वॅक्सीनला ड्रग रेग्युलेटरकडून मंजुरी मिळाली आहे.

BBV१५४ असे या लसीचे नाव असून त्याची प्री क्लिनिकल स्टडीजमध्ये टोक्सीकॉलाजी, रोगप्रतिकारक शक्ती तसेच इतर अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये त्या पूर्ण झाल्या असून मानवी चाचणी पहिला टप्पा फेब्रुवारी- मार्च २०२१ पासून सुरू होतील, असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे. इंट्रानेसल वॅक्सीन देण्यासाठी सोप्या असतात. सोबतच या लसीमुळे सुई, सिरिन आणि अन्य वैद्यकीय वस्तूंचा खर्च, कचरा कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या लसीमुळे लसीकरण मोहिमेचा खर्च देखील कमी करण्यास मदत होणार आहे.

नाकाद्वारे देण्यात येणारी लस ही अंतस्नायू लसी पेक्षा वेगळी असते. या लसीमध्ये दोन्ही नाकपुड्यांमध्ये केवळ थेंबभर औषध पुरेसे होणार आहे. सध्या तातडीची मंजुरी मिळालेल्या दोन्ही लसींचे लोकांना प्रत्येकी २ डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे हे काम वेळखाऊ आणि खर्चिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER