राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू

Bharat Bhalke

सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. मात्र कोरोनावर (Corona) मात करून ते काही दिवसांपूर्वी घरी परतले होते. परंतु त्यांची प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भारत भालके यांची कोरोना चाचणी ३० ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. मात्र लगेचच ४ नोव्हेंबरला ते कोरोनामुक्त झाले आणि घरी आले होते. परत गेल्या आठवड्यात त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुबी हॉस्पिटला दाखल झाले होते. कालपासून त्यांची तब्येत खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना किडनीचा आजार तसेच मधुमेहाचा त्रास आहे.

दरम्यान, भारत भालके यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, जनतेच्या सेवेसाठी ते परत लवकर बरे होऊन यावेत यासाठी आमदार भालके यांचे धाकटे बंधू पंजाबराव भालके यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला साकडे घातले. “भारत भालके यांच्या प्रकृतीत आज दुपारी सुधारणा होत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावे, लवकर या संकटातून बाहेर यावेत” असं साकडं त्यांचे लहान बंधू पंजाबराव भालके यांनी घातलं.

याबाबत त्यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारास ते प्रतिसाद देत आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER