भारत भालकेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक ; राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

bharat-bhalke-pandharpur-vidhansabha-bypoll-who-will-be-ncp-candidate

सोलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची (Pandharpur Assembly constituency) पोटनिवडणुकी लवकरच पार पडणार आहे . राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे. पंढरपूरसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट दिले जाणार, निवडणूक बिनविरोध होणार की भाजप आपला उमेदवार मैदानात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे .

निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची यादी मागवली आहे. विधानसभेचे पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याचा नियम असल्याने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंढरपूर विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून सर्वेक्षण करुन उमेदवारी दिली जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर भाजप उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचं पाठबळ असेल. आमदार-खासदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे राजकीय संकेत बऱ्याचदा पाळले जातात. त्यामुळे भाजप मैदानात न उतरता ही निवडणूक बिनविरोध करणार, की पंढरपुरात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगेल याची उत्सुकता आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER