बंद मध्येही शिवसेनेचा सवता सुभा : दोन गटाच्या स्वतंत्र रॅली

Shivsena

कोल्हापूर : माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) आणि जिल्हाप्रमुख संजय पवार-विजय देवणे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातून दोन स्वतंत्र रॅली काढल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन वेगवेळ्या रॅली काढत भारत बंदचे आवाहन केले. बंदच्या पार्श्वभूमीवरही जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदार आणि जिल्हाप्रमुख असा दोन गटातील सवता सुभा दिसून आला.

बंद तर बंद सगळंच बंद अशी घोषणा देत शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता भवानी मंडपातून शहरातील प्रमुख रस्त्यावर भगवी रॅली काढली. यादरम्यान, एकाही व्यापाराला दमदाटी न करता शांततेत बंदचे आवाहन करण्याचा नियम शिवसैनिकांनी काटेकोरपणे पाळला. बिंदू चौकात एल्गार मेळाव्यात रॅलीचे विसर्जन करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीची सुरुवात झाली. हातात भगवे झेंडे आणि भगवे उपरणे घेतलेल्या शिवसैनिकांनी शहरातील प्रमुख रस्त्यावरुन दुचाकीवरुन फेरी मारली. भवानी मंडप, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, महाराणा प्रताप चौक, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, सीबीएस, परिख पुल, राजारामपूरी बस रुट, मुख्य गल्ली, पार्वती टॉकिज मार्गे रॅलीची बिंदू चौकात सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER