भांडुप अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

rape_survivor

मुंबई : भांडूपमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळील एका नाल्यातून ताब्यात घेतला असून आरोपीला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांनी दिनांक 5/11/19 रोजी पोलीस ठाणेस येऊन फिर्याद दिली की, त्याची अल्पवायींन मुलगी हकोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कायदेशीर रखावालीतून फूस लावून पळवून नेली, म्हणून CR NO 407 /19 कलम 363 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर मुलींचा मृतदेह दिनांक 9/11/19 रोजी विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळ मिळून आल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यांत घेऊन शवविच्छेदनसाठी राजावाडी शवविच्छेदन केंद्र याठिकाणी पाठविला.  डॉक्टरांनी मृत्यूचे कारण stangulation with sexual assault असे दिलेले आहे. त्यामुळे वर नमूद गुन्ह्यात कलम 302, 376 (i) (L), 201, भादवि सह पोक्सो कायदा ही कलमे वाढविण्यात आलेली आहेत. सदर गुन्ह्यात आरोपीस ताब्यांत घेतलेले असून पुढील तपास सुरू आहे. वपोनि, भांडूप पोलीस ठाणे