तुळजापुरात भक्तांचा महापुर; अनेक भाविकांनी केली अष्टमी निमित्य महायज्ञआहुती

तुळजापूर प्रतिनिधी : नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने काल दि.6 रोजी अष्टमीच्या दिवशी तुळजापुरात भक्तांचा महापूर लोटला होता. या दिवशी साडेतिन पिठातील शक्तीपिठांना विशेष अन्यन्य साधारण महत्व असल्याने देशभरातून भक्त दर्शनासाठी व होम हवन आणि महायज्ञाच्या आहुतीसाठी तुळजापुरात दाखल होतात.

या प्रसंगी नांदेड येथील द.म.रेल्वेचे अधिकारी जयंत आर्वीकर व त्यांचे सुपुत्र आशितोष आर्वीकर यांनी हजारो भक्तांसह तुळजाभवानीच्या अष्टमी निमित्य योजलेल्या महायज्ञात सहभागी झाले होते. आई उदो उदोच्या गजरात हा होम हवन व महायज्ञ आहुतीचा कार्यक्रम मोठया भक्तीभावात व उत्साहात संपन्न झाला. या वेळी लाखो भावीकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.