अंगणवाडी सेविकांचा मानधनासाठी भजन मोर्चा

Bhajan Morcha

सांगली :- अंगणवाडी सेविका, मिनी सेविका आणि मदतनीसांना दोन-दोन महिने मानधन मिळालेले नाही. अंगणवाडीच्या सर्व कारभाराच्या नोंदी मोबाईलवर ऑनलाईन करायच्या आहेत, मात्र डिसेंबरपासून रिचार्जसाठी अनुदान दिले नाही. यासह अन्य मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषदेबाहेर टाळनाद भजन मोर्चा काढण्यात आला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडक मारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने जिल्हाध्यक्षा स्नेहलता कोरे, उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेला निवेदन दिले आहे. निवेदनातील मागण्या शासनस्तरावरील आहेत. या मागण्यांकडे शासनाचे तातडीने लक्ष वेधावे. सेविका, मदतनीस यांना शासनस्तरावरून ऑनलाईन मानधन मिळते; ते दरमहा 1 तारखेला किँवा 10 तारखेच्या आत मानधन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाला शिफारस करावी, अशी मागणी केली आहे. जिल्ह्यात सुमारे पाच हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस काम करत आहेत. िअतशय तुटपुंजे मानधन मिळत आहे. तरिही प्रामाणिकपणे काम करत आहेत.