भाई जगताप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष

Bhai Jagtap

नवी दिल्ली : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी (Mumbai Congress President) विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे खांदेपालट करण्यात आला. भाई जगताप यांची निवड झाली. (Bhai Jagtap Elected As Mumbai Congress President) कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा, प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान, समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमरजित सिंग मनहास यांची नियुक्ती झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER