भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचे होते पण डरपोक…  निलेश राणेंचा टोला

Nilesh Rane - Bhai Jagtap

मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेल्या उत्तरावरून सध्या भाई जगताप हे चर्चेत आहेत. मात्र आता भाई जगताप यांच्याविरोधात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे. भाई जगताप हे टपोरी असल्याची टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली.

“भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचे होते पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसानं स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकते.” असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER