मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप ?

Bhai Jagtap

नवी दिल्ली : मुंबई काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदासाठी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांच्या (Bhai Jagtap) नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आली आहे. भाई जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या अध्यक्षपदासाठी वेगवेगळे नेते जोरदार लॉबिंग करत होते. त्यात मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, वर्षा गायकवाड यांचाही समावेश होता. मुंबईतील नेत्यांची दिल्लीत ये-जा वाढली होती. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्लीवारी केली होती. त्यात आता भाई जगताप यांनी बाजी मारल्याचं दिसत आहे.

ही बातमी पण वाचा : कृषी कायद्यातल्या बदलांसाठी काँग्रेसचे दबावाचे राजकारण ? चव्हाणांचे अजित पवारांना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER