भाग्यश्रीचे वाचनवेड

Baghyashree

कोण म्हणते की कलाकार हे चांगले वाचक नसतात? त्यांच्या हातात सतत मोबाईल असतो आणि आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यातच त्यांना धन्यता वाटत असते ? पण असं खरंच नाहीय. कारण सेलिब्रिटी म्हणून सतत प्रकाशझोतात असणारे कलाकार हेदेखील एक उत्तम वाचक आहेत याची प्रचिती आपल्याला अनेकदा येते. जसे कलाकार आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात तसेच त्यांनी काही नवीन वाचलेल्या गोष्टी, त्यातील अर्थ, तसेच वेगवेगळ्या पुस्तकांचे संदर्भदेखील ते आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात. याच पंक्तीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचे देखील नाव घ्यावे लागेल; कारण एकेकाळी पुस्तके वाचणाऱ्या लोकांकडे नेहमी आश्चर्याने बघणारी भाग्यश्री लिमये (Actress Bhagyashree Limaye) आता मात्र तिला पुस्तक वाचल्याशिवाय आणि पुस्तक वाचल्यानंतर त्यावरचे चिंतन लिहून काढल्याशिवाय चैन पडत नाही.

कलाकारांच्या सोशल मीडिया पेजवर फक्त त्यांचे व्हिडीओ असतात का? तर असं नक्कीच नाही. कलाकार हे फक्त त्यांचे वेगवेगळे फोटो आणि मालिका चित्रपट यांच्या प्रमोशनल पोस्ट करत असतात का? तर असेही नक्कीच नाही. कारण जर आपण भाग्यश्री लिमये हिचा नुकताच तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडीओ पाहिला तर त्यामध्ये तिने दोन उत्तम लेखकांच्या साहित्यकृती वाचल्यानंतर तिला काय वाटतं हे अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केले आहे. नुकतेच तिने या दोन लेखकांच्या पुस्तकांचे वाचन केले  आणि केवळ वाचन करून तो विषय सोडून न देता त्या दोन्ही पुस्तकांमधील आशय-चिंतन केले आहे. ते चिंतन तिने तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले. त्यामध्ये तिने सध्या जे वाचन केले आहे ते मुळात संशोधन आणि वैज्ञानिकांनी मांडलेल्या सिद्धांतावर आधारित आहे. खरं तर तो विषय क्लिष्ट आहे; मात्र भाग्यश्रीने केलेल्या चिंतनातून एखाद्या संशोधनातील जड विषयदेखील किती सोप्या पद्धतीने सांगता येऊ शकतो याची प्रचिती दिली आहे. या संवादांमध्ये भाग्यश्री असे म्हणते, की माणसाच्या जगण्यातील वेगवेगळ्या गोष्टी संदर्भाने बदलत जातात त्याचा वेध खूप छान आहे.

इतकेच नव्हे तर भाग्यश्रीने या पुस्तकातून, या पुस्तकाच्या वाचनातून अनेक वेगवेगळ्या गोष्टीदेखील उजेडात आणल्या आहेत. सत्य ही संकल्पना जरी निर्विवाद असली तरी एखादे सत्य परिस्थिती बदलल्यानंतर अवैध ठरू शकतं हा विचार शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवला आहे. तसेच माणसाच्या वर्तनामध्ये सातत्य असणे किती गरजेचे आहे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते सातत्य काळानुरूप बदलले पाहिजे, असादेखील विचार तिने वाचलेल्या पुस्तकांवरून मांडलेला आहे. तो भाग्यश्रीने या सगळ्या चिंतनामध्ये व्यक्त केला आहे. सुरुवातीला त्या पोस्टमध्ये ती हेच सांगते की, मी पुस्तक वाचल्यानंतर केवळ पुस्तक वाचलं आणि आपलं काम झालं असं न म्हणता आपण वाचलेल्या साहित्यातील एक आकलन बिंदू इतरांना शेअर करावा यासाठी माझा प्रयत्न आहे.

खरं तर लहानपणी अभ्यासाचे पुस्तक सोडून कुठलेही पुस्तक वाचण्याचा मला खूप कंटाळा येत होता. मी आईसोबत पुस्तकांच्या दुकानात गेल्यानंतर तिथे पुस्तकं खरेदी करण्यासाठी लोक येत. त्यांच्याकडे बघून मला नेहमी असा प्रश्न पडायचा की, हे लोक पुस्तके कधी वाचत असतील? पण हळूहळू जसजसे मी मोठी होत गेले आणि त्याच्यानंतर पुस्तक वाचण्याची आवड मला निर्माण झाली. त्यानंतर मला खरं तर वाचनातून मिळणारं ज्ञान जाणवलं. आपल्या विचारांमध्ये येणारी प्रगल्भता वाचनातून आहे त्याचं  महत्त्व पटलं. आता पुस्तक वाचल्याशिवायच नव्हे तर त्यातले नोट्स किंवा माझे स्वतःचे टिपण काढण्याचे मला वेड लागले आहे.

‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून भाग्यश्रीने साकारलेली अमृता ही भूमिका लोकप्रिय झाली होती. याशिवाय भाग्यश्री नाटक, सिनेमा यामध्येही सक्रिय आहे; शिवाय रांका ज्वेलर्स या जाहिरातीतील भाग्यश्रीचा लूक सगळ्यांना खूपच आवडला आहे.

ही बातमी पण वाचा : त्या एका संधीने घडवलं पूजाचं आयुष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER