भाग्यश्रीही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार

Bhagyashree

मैंने प्यार किया चित्रपटातून सलमान खानच्या (Salman Khan) नायिकेच्या रुपात भाग्यश्रीने रुपेही पडद्यावर आगमन केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. भाग्यश्रीलाही अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. काही चित्रपटात काम केल्यानंतर भाग्यश्रीने लग्न केले आणि पतीलाही नायक बनवले, या दोघांनी काही चित्रपट एकत्र केले पण ते सर्व फ्लॉप झाल्यानंतर मात्र या दोघांनी चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मोठ्या कलाकारांनी आगमन केले असून आता यात भाग्यश्रीचाही (Bhagyashree) समावेश होणार आहे. भाग्यश्रीने मोठ्या पडद्यावर

अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरमध्ये राहाणारी गुंजन कुठियाला ग्रे स्टोरीज नावाने एक बोल्ड चित्रपट तयार करीत असून या चित्रपटात काम करण्यासाठी तिने भाग्यश्रीची निवड केली आहे. विशेष म्हणजे भाग्यश्रीही या चित्रपटात काम करण्यास तयार झाली आहे. भाग्यश्रीसोबत निळ्या डोळ्यांचा पापा कहते हैं चित्रपटातील ‘घर से निकलते ही कुछ दूर चलते ही’ गाण्याने प्रचंड लोकप्रिय झालेला परंतु नंतर चित्रपटसृष्टीतून बाहेर गेलेला जुगल हंसराजही ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगमन करीत आहे. प्रख्यात कॉमेडियन किकू सारडाही रोमँटिक भूमिका साकारताना दिसणार आहे. चार कथा असलेल्या या चित्रपटात समीर सोनी, हितेन तेजवानी, गौरव गेरा, राइमा सेन, सादिया सिद्दीकी, आदिती गोवित्रीकरही काम करणार आहेत. या चारही कथांचा विषय अत्यंत बोल्ड असून स्त्री पुरुष संबंधांबरोबरच दोन स्त्रियांच्या संबंधांवरही या चित्रपटात भाष्य करण्यात आले असून स्त्रीचे नग्न सौंदर्य कलात्मकतेने दाखवले असल्याची माहिती गुंजनने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER