भागवताचार्य वासुदेव उत्पात यांचे निधन

Bhagavatacharya Vasudev Utpat passed away.jpg

सोलापूर : पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ हिंदुत्वावादी, कट्टर सावरकर विचारवंत, भागवताचार्य वासुदेव नारायण उत्पात (Bhagavatacharya Vasudev Utpat) (वा़ना़उत्पात) (८०) यांचे आज वयाच्या ८० व्या वर्षी कोरोनामुळे पुण्याच्या खाजगी रूग्णालयात निधन झाले.

संत साहित्य, सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. ते विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य होते.

उत्पात ३३ वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुमार्सात भागवत सांगत. चातुमार्सात त्यांची ज्ञानेश्वरी वर प्रवचने देखील अनेक वर्षे सुरु होती. ते रुक्मिणीमातेचे वंशपरंपरागत पुजारी होते़. ३९ वर्षे त्यांनी कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे संस्कृत, मराठी, इंग्रजी, इतिहास या विषयाचे अध्यापन केले. त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात श्रीमदभागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी यांचे सप्ताह, प्रवचने केली. विविध विषयांवर व्याख्याने दिलीत. पंढरपुरातील समाजकारण, राजकारण यात त्यांचे मोलाचे योगदान आहे़. ते २५ वर्षे नगरसेवक आणि २ वर्षे नगराध्यक्ष होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER