मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भगतसिंग कोश्यारी!

bhagat singh koshyari

नवी दिल्ली :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची नेहमी राजकीय वर्तुळात चर्चा असते. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) कोश्यारी यांची मुख्यमंत्री (CM Post) म्हणून नियुक्ती होऊ शकते. सध्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याविरुद्ध भाजपा आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे उत्तराखंडात नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते. उत्तराखंडचे अनेक आमदार आणि मंत्री सध्या दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. मुख्यमंत्रीदेखील दिल्ली दौऱ्यावर आहेत.

रावत यांना पक्षनेतृत्वाकडून राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती आहे. अद्यापही याबद्दल अधिकृत घोषणा झाली नाही. रावत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा (JP Nadda) आणि संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली आहे. पक्ष नेतृत्वाचे रमणसिंग आणि दुष्यंत गौतम यांना उत्तराखंडच्या दौऱ्यावर पाठवले होते. त्यांनी ४५ आमदारांशी चर्चा केल्याचे समजते. नंतर त्यांनी अहवाल राष्ट्रीय कार्यकारिणीकडे दिला. आज अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील, अशी माहिती आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडीत भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. उत्तराखंडची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत फक्त एकाच मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला होता. तर कोणताही मुख्यमंत्री न बदलता पुढील निवडणूक लढवण्याची पद्धत भाजपात आहे. त्यामुळे भाजपा काय निर्णय घेईल, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER