हमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र के ‘राज’ के दर्शन नही हुए, राज भेटीत राज्यपालांकडून स्वागत

Bhagat Singh Koshiyar Welcomes Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshiyari) यांची भेट घेतली. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं, तसंच राज्यपालही या भेटीसाठी उत्सुक होते. कारण या भेटीदरम्यान राज्यपाल राज ठाकरेंना सुरुवातीलाच म्हणाले, “हमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र के राज के दर्शन नही हुए” ,असे राज्यपाल म्हणाले .

लॉकडाऊनमध्ये लोकांना रोजगार नाही, पैसा नाही तरीही लोकांची वीजबिलं चार-पाच पट आली आहेत, त्या बिलांच्या कपातीबाबत निर्णय व्हावा अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली.

राज ठाकरे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास राज भवनावर पोहोचले. राज ठाकरेंनी राज्यपालांसोबतच्या भेटीत लॉकडाऊनमध्ये नागरिकांना आलेल्या वाढीव वीज देयकांचा मुद्दा मांडला. जर हॉटेल्स किंवा अन्य व्यवसायांना करात सवलत मिळत असेल तर वाढीव वीज देयकांचा भुर्दंड नागरिकांना का ? असा मुद्दा राज ठाकरेंनी सरकारसमोर उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER