झटपट कर्ज देणाऱ्या लोन अँप्स पासून रहा सावधान !

गेल्या वर्षी मार्चनंतर कोरोनाचा झटपट प्रसार झाला. संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करावं लागलं. यामुळं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक संकट ओढावली. अनेकांचे व्यवसाय उधवस्त झाले. लॉकडाऊनमुळं अनेकांची आर्थिक परिस्थीती ढासळली. हातात काहीच नव्हतं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी, आर्थिक कोंडी फोडण्यासाठी अनेकांनी त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या अँप्सच्या माध्यमातून कर्ज मिळवायला सुरुवात केली.

या अँप्सद्वारे कर्ज मिळवणं खूप सोप्प होतं. जिथ सरकारी आणि बिगर सरकारी बँका कर्ज देण्यासाठी अनेक कागदपत्र मागतात. कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. यात बरीच वेळ आणि उर्जा खर्च होते. या तुलनेत या अँप्सद्वारे कर्ज मिळवणं अधिक सोप्प होतं. यात फक्त आपल्या बँकांचा तपशील आणि ओळखपत्र त्यांना द्यावे लागायचे. हे सर्व डिटेल्स दिल्यानंतर काही मिनीटातच कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा व्हायची. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या लाखो जणांना असलेली पैशाची गरज ओळखून अनेक अँप्स बाजारात आले.

आता लॉकडाऊन संपलंय. अनेक जण पुन्हा कामावर रुजू झालेत. पण या परिस्थीती ही बाब ही लक्षात घेतली पाहिजे की, लघू व्यापारी, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि सेल्समॅनपासून अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना यासाठी संघर्ष करावा लागतोय. एका मोठ्या वर्गाला अजूनही आर्थिक स्थैर्य मिळालेलं नाहीये. त्यांनी मदतीसाठी अशा अँप्सचा वापर केला.

इथं गरजेनूसार कर्ज मिळवता येतं. पंधरा दिवसांसाठी १० हजारांच कर्ज मिळतं. प्रोसेसिंग फी घेतली जाते. प्रोसेसिंग फी व्याजदराच्या तुलनेत काहीच नाही. या कर्जावर जवपास ३० टक्के व्याजदर आकरलं जातंय. या तुलनेत बँका फक्ता १० ते २० टक्केच कर्ज घेतात.

अनेक राज्यांमध्ये अशा अँप्सवर गुन्हे दाखल होताहेत. कारण कर्जाची वसूल करण्यासाठी हे लोक वाट्टेल त्या थराला जाताना दिसताहेत. आक्रमक पद्धतीने कर्जाची वसूली सुरु असल्याचे आरोप होत आहेत. आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारी ईडी यासंबंधी तपास करते आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन असे अँप्स हटवण्यात आलेत.

यातले अनेक असे अँप्स आहेत ज्यांची नोंद राष्ट्रीय बँकांकडे करण्यात आलेली नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बँकांवर कारवाई करण्याची तयारी सुरुये. तज्ञांचं म्हणन आहे की, एकदा कुणी कर्ज घेतं तर त्यांचा डेटा अशाप्रकारे कर्ज देणाऱ्या इतर इतर अँप्ससोबत तुमचा डेटा शेअर होतो. यानंतर कर्ज घेण्यासंबंधी वारंवार संदेश यायला सुरुवात होते. या नोटेफिकन्समुळं अनेकांनी आठ- दहावेळेस कर्ज घेतल.

सायबर सिक्यूरीटी तज्ञांनी याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केलेत. हे अँप्स डाऊनलोड केल्यानंतर फक्त कॉन्टॅक्ट लिस्ट सोबत फोटो, व्हिडीओ आणि लोकेशन्सलर नजर ठेवली जाते. तुम्ही वापरलेला पैसा, केलेले व्यवहार अशा सर्व गोष्टींवर नजर ठेवून असतात.

अनेकांनी धमक्यांच्या फोन्सना कंटाळून आत्महत्या केल्यात. कर्जामुळं त्यांच जीव गेलाय. आर्थिक रित्या दुर्बळ व्यक्तींची लुबाडनूक इतकाच या अॅप्सचा अजेंडा नसून याहून अधिक खतरनाक त्यांची उद्दिष्टे आहेत. हे अॅप्स तुमच्या डेट्यावर नजर ठेवून आहेत. हा डेटा विकून ते पैसा कमावताहेत. वापरकर्त्याचा पर्सनल डेटा विकून ते तगडा पैसा कमवताहेत.

या अँप्सवर जोवर कायदेशीर लगाम लागणार नाही तोपर्यंत अनेकांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER