इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज़ सामन्यावर सट्टा

दादर पाठोपाठ जुहू मधून गुजरातच्या दोन बुकींना अटक

betting on India vs West Indies match

मुंबई : वर्ल्डकप सामन्यावरील सट्टेबाजीप्रकरणी दादरमध्ये केलेल्या कारवाईपाठोपाठ जुहू पोलिसांनी गुरूवारी इंडिया विरुद्ध वेस्ट इंडीज़ सामन्यावर सट्टा लावणाऱ्या गुजरातच्या दोन बुकींना बेड्या ठोकल्या आहेत. धरमभाइ भाबलुभाई वाला (४२), बिपीनभाई ब्रहमभट्ट (४०) अशी अटक आरोपीची नावे आहेत.

गुरुवारी रात्री सनअँड सँड हाँटेलच्या चौथा माळ्यावरील रुम नं ४३० मध्ये सट्टा सुरु असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने छापा टाकला. तेव्हा धरमभाइ, बिपीनभाई हे दोघे वर्ल्डकप सिरीजमधील इंडिया आणि वेस्ट इंडीज़ संघा दरम्यान सुरु असलेला सामन्यावर सट्टा खेलत असताना दिसून आले. त्यांच्याक़डुन २४ मोबाईल फोन, एक टँब, दोन लँपटाँप ,रोख रक्कम ४४ हज़ार ६७० असा एकुण २ लाख ५५ हज़ार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोउनि हरिभाउ गोविंदराव बिरादार (34) यांच्या तक़्रारीवरून जुहू पोलीस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरमभाई हा अहमदाबाद तर बिपीनभाई हा गुजरातचा रहिवासी आहे. दोघाँकड़े जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत.

दादरमध्ये यापूर्वी कारवाई
वर्ल्डकप सामन्यावरील सट्टेबाजीप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अटक केलेले बुकी मिकीन शहा (33) याच्यासह त्याचे साथिदार मनीष सिंग (31) आणि प्रकाश बनकर (32) हे वर्ल्डकप सिरीजमधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड वर सट्टा खेलत होते. तर भायखळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर खरमाटे (34) हा सामना बघत होता. पोलिसांनी छापा टाकताच खरमाटेसह चौघाना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.