विश्वासघाताने आलेले सरकार विद्यार्थ्यांशी विश्वासघात करतेय – गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar - Maharastra Today

मुंबई : राज्यात एमपीएससीची (MPSC) पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे काल पुण्यात संतप्त झालेल्या विदयार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन केले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेऊन या आंदोलनाला आणखी तीव्र केले होते. विद्यार्थ्यांचा संताप लक्षात घेता १४ मार्चला ढकलण्यात आलेली पूर्व परीक्षा आता येत्या २१ मार्च रोजी घेण्याचं राज्य लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

गुरुवारी पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप करत पडळकरांनी सरकारवर निशाणा साधला. “मुळात २०१९ला हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. या सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमपैकी विश्वासघात हा एक प्रोग्रॅम आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत, कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत, कधी लाईट बिलाच्या बाबतीत. या विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पुढे ढकलून सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी सरकार खेळतंय. माझ्यासोबत आंदोलनात असलेले विद्यार्थी लादेन समर्थक होते का? पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार का केला, असं पडळकर यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल न करता आमच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणीही पडळकर यांनी केली. तसेच आज जाहीर केल्याप्रमाणे जर २१ मार्च रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली नाही तर मी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर उपोषणावर बसेल असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER