मंडळे बंदकरून जनतेचा विश्वासघात; महाआघाडी सरकारवर फडणवीसांची टीका

Mahavikas Aghadi - Devendra Fadnavis

नागपुर :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) विकास मंडळे बंदकरून विदर्भ, मराठवाड्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. फडणवीस नागपूर (Nagpur) दौऱ्यावर असता माध्यमांशी बोलून त्यांनी महाआघाडी सरकारवर टीका केली. सरकारने विदर्भ, मराठवाडा विकास मंडळ बंद केले आणि मागास भागांना निधी वाया घालवण्याचा मार्ग मोकळा केला. निधी पळविला तरी, कोणी थांबवू शकत नाही. नजीकच्या काळात निधी पळविल्याचे दिसून येईल, असेही ते म्हणाले.

“सहकार विभागाने अजित पवार यांना क्लीन चीट दिली असल्याकडे लक्ष वेधले असता, राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणात सहकार विभागाचा अहवाल आला आहे. कोर्टात अहवाल सादर झाला असला तरी, यावर निर्णय घेतलेला नाही. निर्णयानंतरच प्रतिक्रिया व्यक्त करता येईल. एकनाथ खडसे यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपाबाबत कोणीही याचिका करावी, न्यायालयात उत्तर देऊ.” असे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

अधिवेशनाबाबत बोलत असताना फडणवीसांनी सांगितले की, “अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी वीज बिलासह अनेक मुद्दे आहेत. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सत्ताधारी पक्षात राहून वीज बिल माफीवर विरोधकांचे मज्जा घेत आहेत. त्या पक्षाचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी ठामपणे भूमिका घ्यावी.”

ही बातमी पण वाचा : देवेंद्र फडणवीसांमुळे बहुजनांची पोरं आमदार झाली : सदाभाऊ खोत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER