हिवाळ्यात फिरायला जायचे आहे? मग ‘हे’ आहेत बजेटमध्ये बसणारे बेस्ट डेस्टिनेशन्स

Himachal-Pradesh

नवी दिल्ली :- घरातील लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे लोकं हिवाळ्यातील सुट्यांची वाट बघत असतात. कारण, या सुट्ट्यांमध्ये ते कुठेतरी थंडगार ठिकाणी फिरायला जायचा विचार करून ठेवतात. परंतु, कमी बजेटमुळे ते प्रत्येकवेळी शक्य होत नाही. जर तुम्ही यावर्षी सुट्टीत फिरण्याचे प्लॅन करत असाल आणि तुमचे बजेट 10 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, तर तुम्ही या ठिकाणी आपल्या कुटुंबासह नक्कीच एन्जॉय करायला जाऊ शकता.

तवांग, अरुणाचल प्रदेश :
Tawang-Arunachalतवांग हे अरुणाचल प्रदेशमधील फिरण्याचे सर्वात सुंदर ठिकाण आहे. तवांग आपली मॉनेस्ट्री, बौद्ध मठ आणि उंच डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. दिल्लीहून ट्रेनमधून फक्त १५०० रुपयांत येथे पोहोचता येते. येथील हॉटेल्स देखील स्वस्त असून ५०० रुपये प्रति रात्री किंवा यापेक्षा कमीमध्येही हॉटेल मिळू शकते. खाण्या पिण्याचा देखील येथे जास्त खर्च नसतो. नैसर्गिक सुंदरता असलेल्या तवांगमध्ये पाहण्यासारखी खूप ठिकाणे आहेत.

ऋषिकेश, उत्तराखंड : 
Raftingउत्तराखंडमधील ऋषिकेश हे एक देवस्थान म्हणून प्रसिद्ध तर आहेच, परंतु येथील रिव्हर राफ्टिंही तितकीच प्रसिद्ध आहे. दिल्लीहुन ऋषिकेश रिव्हर राफ्टिंगसाठी बऱ्याच कंपन्या पॅकेजेस देतात. ज्यामध्ये 2 ते 5 हजार रुपयांमध्ये दोन दिवस आणि एक रात्र असे पॅकेज असते. या टूर पॅकेजमध्ये खाणे-पिणेदेखील असते. जर तुम्ही टूर पॅकेज न घेता गेलात तर तुमचा यापेक्षाही कमी खर्च होतो. दिल्लीपासून ऋषीकेशपर्यंतचे भाडे २०० रुपयांपासून सुरु होते आणि नदीकिनाऱ्यावरचे टेन्ट हाऊस तुम्हाला ५०० ते १००० रुपयांपर्यंत मिळते.