बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा भाजपप्रवेश

Srabanti Chatterjee Joins BJP

मुंबई : बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी (Srabanti Chatterjee) हिने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला . आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चटर्जींनी भाजपप्रवेश केला. पश्चिम बंगालमधील प्रघातानुसार यंदाही निवडणुका ‘तारांकित’ होण्याची चिन्हं आहेत.

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला.

पश्चिम बंगालच्या मनोरंजन विश्वामधील अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून अनेक सेलिब्रिटी राजकीय रिंगणात उतरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER