बंगाल हिंसाचार : अशा घटना फाळणीच्या वेळी घडल्याचे ऐकले होते – नड्डा

JP Nadda - Mamata Banerjee - Maharashtra Today
JP Nadda - Mamata Banerjee - Maharashtra Today

कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची भारतीय जनता पार्टीचे (BJP) अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आज पाहणी केली. ते म्हणाले की, अशा घटना भारताच्या फाळणीच्या वेळी घडल्या होत्या. त्यांनी या घटनांबद्दल दुःख व्यक्त केले. ते कोलकाता इथे दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.

कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीच्या निकालानंतर तिथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटना चिंताजनक आणि धक्कादायक आहेत. अशा घटना भारताच्या फाळणीच्या वेळी घडल्याचे मी ऐकले होते. स्वतंत्र भारतात निवडणूक निकालानंतर अशा प्रकारच्या घटना घडल्याचे कधी पाहिले नव्हते. ”

ते पुढे म्हणलेत, “वैचारिक लढाई लढण्यासाठी वचनबद्ध आहोत. तृणमूलकडून होणारे हे प्रकार असहिष्णू आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने याविरुद्ध लढणार आहोत. मी आता पुढे या हिंसाचारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवारांना भेटणार आहे. ”

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या हिंसाचाराबाबत भाजपाने चिंता व्यक्त केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बंगालमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. याबाबतची माहिती राज्यपाल जगदीप धनखर यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button