बंगाल हिंसा ; टाळी एका हाताने वाजत नाही ; संजय राऊतांचे भाजपला खडेबोल

Sanjay Raut

मुंबई : पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाला लागल्यानंतर बंगालमध्ये हिंसा उसळली आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालाबाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतंय त्याचा शोध घ्या, अशा शब्दांत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहे . राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील मनाची भावना या निकालात प्रतिबिंबीत झाली आहे. परंतु, या निकालानंतर बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे. दोन्ही बाजूने शांतता राखली पाहिजे. केंद्राने आणि बंगालच्या सरकराने संयमाने राहावे लागेल. बंगालचा इतिहास रक्तरंजित आहे. हे खरे आहे. पण सर्वांनी देशाची परिस्थिती पाहावी. कोरोनाची परिस्थिती ओळखून काम करावं. एकमेकांना धमक्या देणं थांबवावं, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे की बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतोय याचा शोध घ्या, या हिंसेचा तपास झालाच पाहिजे, असेही राऊत म्हणाले . 2024ची लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र मिळवून लढवू. राहिला नेतृत्वाचा प्रश्न तर दिल्लीत बसून कोण नेतृत्व करेल हे पाहावं लागेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. ममता बॅनर्जी यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 5 मे रोजी राजभवनात त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button