बंगाल ‘टीएमसी’ला राम कार्ड दाखवणार – मोदी सरकार

Mamata Banerjee - PM Narendra Modi

“बंधू आणि भगिनींनो बंगाल फुटबॉलवर प्रेम करणारे राज्य आहे. मी फुटबॉलच्या भाषेत सांगू इच्छतो, तृणमूल काँग्रेसने एका पाठोपाठ असे कित्येक ‘फाउल’ केलेले आहेत. त्यामुळे आता लवकरच बंगाल तृणमूलला राम कार्ड दाखवणार आहे.” असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालमधील बैठकीस केले.

पंतप्रधान मोदी आसाम व पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी हल्दिया येथील एका सभेत बोलताना सर्वप्रथम उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयाबाबतची माहिती लोकांना दिली. सातत्याने तिथल्या परिस्थितीची माहिती घेत आहे. तसेच उत्तराखंडासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच “बंगालमध्ये आपली लढाई ‘टीएमसी’ बरोबर आहे. मात्र आपल्याला त्यांच्या छुप्या मित्रांपासूनदेखील सावध रहावे लागणार आहे. डावे, काँग्रेस आणि टीएमसी हे पडद्यामागे मॅच फिक्सिंग करण्यात गुंतले आहेत. दिल्लीत भेटून ते राजकारणावर चर्चा करतात. केरळमध्ये काँग्रेस व डाव्यांनी मिळून पाच वर्ष राज्याला लुटण्याचा करार केला आहे.” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी टीएमसी बरोबरच काँग्रेस व डाव्या पक्षांवर देखील यावेळी निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER