बंगाल निवडणूक : ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला, ममतांच्या पायाला दुखापत

Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप (BJP) विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा सामना बघायला मिळत आहे. भाजपचे नेते आणि तृणमूलचे नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत आहे. त्यातच आज मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली असून, हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत कारमध्ये बसवलं. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपण काही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये तीन ते चार तासांपासून लोकांच्या भेटीगाठी घेत होत्या. त्यावेळी कोणताही स्थानिक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात नव्हता. चार-पाच लोकांनी गाडी बंद केली. त्यावेळी कोणताच लोकल पोलीस कर्मचारी नव्हता. एसपी देखील नव्हते. हे जाणूनबुजून करण्यात आलं. माझ्या छातीतही दुखतंय, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोच चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. कोलकाताच्या व्यूह रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER