बंगाल : काँग्रेस मौलवीच्या आयएसएफसोबत ! आनंद शर्मांचा घरचा आहेर – ही आघाडी …

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि डाव्यांच्या आघाडीत मौलवी अब्बास सिद्दीकी यांचा आयएसएफ ( इंडियन सेक्युलर फ्रंट) ही आहे. यावर काँग्रेसचे नेते आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी पक्षाला सुनावले – कॉंग्रेसची आयएसएफ आणि इतर पक्षांशी युती ही पक्षाची मूळ विचारधारा, गांधीवाद आणि नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे.

आयएसएफ हा पक्ष जानेवारी महिन्यातच स्थापन झाला आहे. मौलवी अब्बास सिद्दीकी हे त्याचे अध्यक्ष आहेत. नावात ‘सेक्युलर’ शब्द असला तरी आयएसएफ एक कट्टर मुस्लीम पक्ष म्हणून नावारुपाला येतो आहे. अशा कट्टर पक्षाशी काँग्रेसने युती करायला नको, असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

याबाबच्या ट्विटमध्ये शर्मा म्हणतात – जातीयवादाविरुद्धच्या लढ्यात कॉंग्रेस सिलेक्टिव्ह असू शकत नाही. आम्हाला सर्व प्रकारच्या जातीयवादाशी लढावे लागेल. पश्चिम बंगाल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांची उपस्थिती आणि पाठिंबा लज्जास्पद आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘कॉंग्रेसची आयएसएफ आणि इतर पक्षांशी युती ही पक्षाची मूळ विचारधारा, गांधीवाद आणि नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे, ही विचारधाराच काँग्रेस पक्षाचा प्राण आहे. या मुद्द्यांवर कॉंग्रेस कार्यकारिणीत चर्चा व्हायला हवी होती. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, आनंद शर्मा हे सोनिया गांधींना पक्षाच्या अवस्थेबद्दल पत्र लिहिणाऱ्या जी २३ गटाचे प्रमुख सदस्य आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER