बंगाल बनला ‘अल कायदा’चा अड्डा; परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट – भाजपाची टीका

Dilip Ghosh

कोलकाता : पश्चिम बंगालच्या कुचबिहार भागात ‘अल कायदा’च्या अनेक सदस्यांची ओळख पटली आहे, असा दावा भाजपा पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. यावरून त्यांनी टीका केली की, बंगाल ‘अल कायदा’चा अड्डा बनला आहे. इथली परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट आहे.

कुचबिहार भागात कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाच्या अनेक सदस्यांची ओळख पटवली गेली आहे. बंगालमध्ये बसून हे दहशतवादी अल कायदाची मदत करत आहेत. देशातील शांतता बिघडवू पाहात आहेत. बंगालमध्ये या दहशतवाद्यांचे नेटवर्क विस्तारले आहे. त्याचा शोध आवश्यक आहे, असे दिलीप घोष म्हणालेत.

याआधी रविवारी दिलीप घोष म्हणाले होते की, भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला तर राज्यात लोकशाही पुन्हा स्थापित होईल. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही इशारा दिला होता की, तृणमूलच्या सदस्यांनी आपली पद्धच बदलावी, अन्यथा त्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात जावे लागेल.

दिलीप घोष (Dilip Ghosh) पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना आतापर्यंत त्रास देणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पुढच्या सहा महिन्यांत सुधरावे. अन्यथा त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER