विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली नावे जाहीर करा : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानपरिषदेसाठी १२ सदस्यांच्या नावांची शिफारस यादी (Vidhan Parishad MLC List) राज्यपालांना दिली आहे. ती नावे राज्यपालांनी लवकरात लवकर घोषित करावी; अन्यथा याचा संदेश बाहेर चुकीचा जाऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणालेत. (Prithviraj Chavan says Governor should announce Vidhan Parishad MLC List suggested by CM quickly)

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे १५ दिवसांच्या मुदतीची शिफारस करण्यात आली आहे, याविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले – विधानपरिषदेमध्ये १२ सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना असतो. मुख्यमंत्र्यांनी १२ नावांची शिफारस यादी राज्यपाल यांना दिली आहे. या शिफारसीचा राज्यपालांनी आदर केला पाहिजे. राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या नावांची घोषणा लवकरात लवकर केली पाहिजे. राज्यपालांनी राज्यघटनेचा आदर करावा, ही आमची अपेक्षा आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी ६ नोव्हेंबरला देण्यात आली होती. १५ दिवसांत राज्यपालांनी दिलेल्या यादीतील नावे जाहीर करावीत, अशी शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांना या नावांबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

विधानपरिषदेवर कोणाला घ्यायचे हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवते आणि त्या नावांची यादी राज्यपालांकडे देते. राज्यपालांना १६७ कलमाखाली सल्ला देता येतो, माहिती विचारता येते किंवा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करता येते; पण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी घेतलेला निर्णय बदलता येत नाही, अशी माहिती घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली होती. राज्यपालांनी किती वेळात निर्णय घ्यायचा हे लिहिले नाही. पण त्यांनी जास्त वेळ लावणे चूक आहे, असे बापट म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER