पीएम किसान योजनेतील लाभ चार हजार रुपयांनी वाढणार

Benefits under PM Kisan Yojana will increase by Rs 4,000
  • २०२१अर्थसंकल्पात निधी मंजूर होण्याची शक्यता.

दिल्लीत सुरू असलेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनाच्या मध्यातच १ फेब्रवारीला २०२१-२२ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत केंद्रावर नाराज असणाऱ्या शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी केंद्राच्यावतीनं काही योजना जाहीर करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. प्रधानमंत्री किसान योजनेच्या अंतर्गत शेतकरी सन्मान योजनेच्या मार्फत १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या वक्तव्याच्या आधारे ही शक्यता वर्तवली जात आहे. त्या म्हणाल्यात, “या वेळचं अर्थसंकल्प सर्वांत वेगळं असेल. मिळत असलेल्या सरकारी प्रक्रियेनुसार प्रतिवर्ष सहा हजार रुपये रक्कम पूरक नाहीये.” या प्रतिक्रियेवरून किसान सन्मान योजनेची रक्कम वाढणार हे स्पष्ट होत असून ती १० हजारांपर्यंत वाढू शकते.

यंदाच्या अर्थसंकल्पाकडे आहे लक्ष

शेतकऱ्यांसंबंधी इतर योजनाही या वर्षी लॉंच केल्या जाणार आहेत. यामध्ये ग्रमीण विकास, प्रधानमंत्री कृषी सिंचन, प्रधानमंत्री पीक विमा या योजनांचा समावेश असेल. एकूण काय तर कृषी विधेयकाविरोधात रस्त्यावर
उतरेल्या शेतकऱ्यांना खूश  करण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना येणार असून शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार आगामी काळात होईल, असं बोललं जातंय.

मोदींनी जाणून घेतल्या होत्या शेतकऱ्यांच्या समस्या

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. सरकारने ज्या योजना सुरू केल्या, त्याचा त्यांना कसा फायदा झाला? गावातील, तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना त्यांनी याची माहिती दिली का? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणून घेतलं होतं.

व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे हस्तांतरित केला होता निधी

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) सातवा हप्ता पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हस्तांतरित केला होता. नऊ कोटींहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले गेले. मोदी म्हणाले, ‘आज एका क्लिकवर देशातील नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून १ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहचली होती.

कधी सुरू झाली होती योजना?

१ डिसेंबर २०१८ला ही योजना सुरू झाली होती. अन्नदात्याला बँकेमार्फत रोख रकमेतून थेट लाभ देण्याचा उद्देश या योजनेचा होता. या योजने अंतर्गत शेतकरी वर्गाला दोन-दोन  हजारांच्या हप्त्यात प्रतिवर्ष सहा  हजार रुपये मिळायचे. या योजनेचे ११.४७ कोटी लाभार्थी आहेत.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER