आयुर्वेदात वर्णिलेल्या केसांकरीता हितकर वनस्पती !

Hairs - Ayurveda

आजकाल शॅम्पू तेल कंडिशनर जेल यांचा इतका सुळसुळाट आहे. प्रत्येक कंपनी आपले प्रोडक्ट कसे चांगले याची जाहिरात करीत असते. सोशल मिडीयावरदेखील अनेक तेल शॅम्पूच्या जाहिराती वाचायला मिळत असतात.

आयुर्वेदात (Ayurveda) केसांच्या समस्यावर आभ्यंतर व बाह्य चिकित्सा सांगितली आहेत. केशाय हितं केश्यं म्हणजेच केसांना हितकर द्रव्यांचा उल्लेख आहे. यात मुख्यतः केशवर्धन करणारे वनस्पती आणि केशरंजन करणारी वनस्पती आहेत.

केस गळणे ही समस्या योग्य केसांचे पोषण होत नसल्याने उद्भवते. केसांची मुळे हलकी झाल्याने केस गळायला लागतात. अशावेळी केशवर्धन करणारी वनस्पतींचा उपयोग होतो.

दूधी, खोबरेल तेल केसांच्या मुळांना चोळून जिरविणे फायदेशीर ठरते. आवळा, गुळवेल सारख्या वनस्पती केशवर्धनाचे कार्य करतात.

  • अकाली केस पांढरे होत असल्यास केशरंजन करणारी द्रव्ये उपयोगी ठरतात.
  • माका – भृंगराज तेल तसे प्रसिद्धच आहे. भृंगराज या वनस्पतीचे पर्यायी नावच केशरंजन, केश्य असे आहे यावरून केसांकरीता किती उपयोगी आहे हे लक्षात येते. उत्तम रसायन उत्तम केश्य वनस्पती भृंगराज आहे.
  • जास्वंद – केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, चाई पडणे या विकारांवर जास्वंद तेल, लेप या रुपात लाभदायक आहे. केसांचे विकार दूर करणारे जास्वंद उत्तम केश्य वनस्पती आहे.
  • नलिनी, आवळा, बिभितक, तिळ, गुंजा अशा अनेक वनस्पती केश्य म्हणजेच केसांकरीता हितकारी सांगितल्या आहेत. प्रकृति, वय, व्याधी कारणांचा विचार करून या वनस्पतींचा उपयोग वैद्य करीत असतात.
  • केस विकाराची कारणे शोधून त्यानुसार द्रव्य उपाययोजना करता येते. आयुर्वेदाची सौंदर्य शास्त्राला मिळालेली ही मोठी देणगीच आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button