आयपीएलमध्ये केवळ विजयासाठीच शतक करणारा बेन स्टोक्स एकटाच

Ben Stokes

बेन स्टोक्स (Ben Stokes) ….आजच्या घडीला जगातील आघाडीचा अष्टपैलू …पण आयपीएलमध्ये (IPL) त्याची बॕट चालेनाशी झाली आणि राजस्थान राॕयल्सचा (Rajsthan Royals). त्याला संघात घ्यायचा डाव फसला की काय असे वाटायला लागले. बेन स्टोक्सला विश्रांती द्यायला हवी अशी चर्चा जोर धरत असतानाच रविवारी बेनने टीकाकारांचा डाव त्यांच्यावरच उलटवला. मुंबई इंडियन्सविरुध्द (Mumbai Indians) त्याने 60 चेंडूतच 107 धावा केल्या आणि राजस्थान राॕयल्सने 8 गडी राखून अनपेक्षित विजय मिळवला.

यासह बेन स्टोक्स हा आयपीएलच्या इतिहासात यशस्वी पाठलागात दोन शतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी त्याने 2017 मध्ये रायझिंग पूणे सुपराजायंटस् साठी असे विजयी शतक केले होते. त्यावेळी गुजरात लायन्साविरुध्द त्याने 63 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली हौती आणि तो सामना रायाझिंग संघाने 5 गड्यांनी जिंकला होता.

मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी बेन स्टोक्स वारंवार अपयशी ठरला होता. त्याने पाच डावात 103 चेंडूत फक्त 110 धावा केल्या होत्या आणि त्यात त्याचा एकही षटकार नव्हता. शआभराहुन अधिक चेंडू खेळलेल्यांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट सर्वात कमी होता. त्यामुळे बेनला खेळवायचेच असेल तर खालच्या क्रमांकावर खेळवावे आणि त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईकरेट राखणाऱ्या जोस बटलरला सलामीला खेळवावे अशी चर्चा होती पण राॕयल्सने बेनला आणखी एक संधी दिली आणि त्याने सोने केले. 59 चेंडूत शतक साजरे करताना त्याने 13 चौकार आणि तीन षटकार लगावले आणि 5, 41, 15, 19 व 30 ही आपली कमी धावांची मालिका संपवली. मुंबईविरुध्द पहिल्या चेंडूपासूनच मोठ्या खेळीच्या निर्धाराने तो खेळताना दिसला आणि म्हणूनच राजस्थानला 196 धावांचे लक्ष्य गाठता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER