विश्वास ठेवा, रोहित आहे तीन देशात आयपीएल जिंकणारा एकमेव खेळाडू!

Mumbai Indiansa Rohit Sharma

मुंबईने (MI) आयपीएल (IPL) विजेतेपद कायम राखले आणि बरेच विक्रम केले. विजेतेपद कायम राखणारा मुंबई हा चेन्नईनंतर (CSK) केवळ दुसरा संघ ठरला. चेन्नईने 2010 व 11 मध्ये विजेतेपद पटकावले होते तर मुंबई 2019 व 2020 चे विजेते आहेत. त्यांचे हे पाचवे विजेतेपद. पाचही वेळा रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार..

रोहितचा हा यशाचा विक्रम तर आहेच हेवा वाटण्याजोगा पण त्याने आणखीन एक विक्रम असा केलाय की जो पुन्हा होईल की नाही…शंकाच आहे. तीन वेगवेगळ्या देशात आयपीएल जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे.

तीन वेगवेगळ्या देशात कसे काय ? ..तर 2009 मध्ये आयपीएलचे सामने दक्षिण आफ्रिकेत (South Africa) खेळले गेले होते. त्यावेळी डेक्कन चार्जर्सचा संघ विजेता ठरला होता आणि डेक्कनच्या त्या विजेत्या संघात रोहित शर्मा हा एक खेळाडू होता.

त्यानंतर रोहित हा आपल्या मूळ मुंबई इंडियन्स संघाकडे आला आणि 2013, 15, 17 आणि 2019 मध्ये त्याने यशाचे झेंडे गाडले. दर एक वर्षाआड रोहितच्या नेतृत्वात मुंबईचा संघ भारत भूमीवर (India) आयपीएलची ट्राॕफी उंचावत राहिला.

यानंतर कोरोनाची साथ आली. सारे वेळापत्रक विस्कळीत झाले.,एप्रिल- मे मध्ये खेळली जाणारी आयपीएल,आॕक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलली गेली. पण उशिराने का होईना…स्पर्धा झाली. सामने भारतात नाही तर युएईमध्ये (UAE). खेळले गेले आणि विषम वर्ष नसताना, अंतिम सामन्यात पाठलाग करत असताना लागोपाठ दुसऱ्या वर्षी मुंबईचा संघ विजेता ठरला आणि दक्षिण आफ्रिका व भारतानंतर आता युएईमध्येसुध्दा यश रोहित शर्माच्या नावावर लागलं. तीन देशात आयपीएल जिंकणारा तो पहिलाच कर्णधार ठरला.

आयापीएलची कर्णधार म्हणून पाच आणि खेळाडू म्हणून सहा विजेतेपदं नावावर असणाराही तो पहिलाच आहे. टी-20 मधील कप्तान म्हणून त्याने जिंकलेली ही आठवी ट्रॉफी आहे. हा सुध्दा संयुक्त विक्रम आहे यशाचा…आयपीएलशिवाय चॕम्पियन्स लिग 2013, निदाहास ट्रॉफी 2018 आणि आशिया कप 2018 विजेत्या टी-20 संघांचाही रोहितच कर्णधार होता. कर्णधार म्हणून एकदाही आयपीएलची फायनल न हरण्याचा त्याचा विक्रम आहे, याशिवाय एक खेळाडू म्हणून तो 10 व्यांदा टी-20 विजेत्या संघात आहे. हासुध्दा भारतीय खेळाडूंसाठी विक्रमच आहे. टी-20 विश्वचषक 2007 चे यश याच्यामध्ये आहे. याप्रकारे रोहित आणि यश यांची पक्की दोस्ती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER