बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात ; शुभम शेळके – मंगला अंगडी यांच्यात चुरशीची लढत

Election

बेळगाव : केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने अवघ्या 26 वर्षीय शुभम शेळके यांना मैदानात उतरवले आहे. बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण उतरले आहेत.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या लिंगायत मतदारांची आहे. एकूण 18 लाख 13 हजार 538 मतदारांपैकी लिंगायत मतदार 6.25 लाख आहेत. यापैकी 3.25 लाख मराठी मतदार आहेत. 1.80 लाख कुरबर, 65 हजार विणकर, 40 हजार जैन, 40 हजार ब्राह्मण, 2 लाख मुस्लिम आणि 2 लाख मागासवर्गीय मतदार आहेत. भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे ही मते भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button