बेळगाव पोटनिवडणुक: अंतिम टप्प्यात भाजपची खेळी, लिंगायत धर्मगुरुंना विनंती, समीकरणं बदलणार ?

CM Yeddyurappa - Lingayat Dharmaguru

बेळगाव :- बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा काल समारोप झाला. उद्या (17 एप्रिल) येथे मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. मात्र, प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला येथे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मंगला अंगडी यांच्या निश्चित विजयासाठी भाजपने मोठी खेळी केली आहे. त्यानंतर आज शेवटचा प्रयत्न म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा (CM Yeddyurappa) यांनी थेट लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेऊन मंगला अंगडी यांच्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.

भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी या लिंगायत समाजाच्या आहेत. त्यामुळे त्यांना लिंगायत समाजाकडून चांगला पाठिंबा मिळावा यासाठी भाजपने मोठा डाव साधला. मिळालेल्या माहितीनुसार काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपने शक्य होईल तेवढा जोरदार प्रचार केला. याच गोष्टीचा विचार करत आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंची भेट घेतली. ही भेट हुक्केरी येथील हिरेमठ धर्मशाळा येथे पार पडली. या भेटीदरम्यान जवळपास ७० धर्मगुरू हजर होते. तसेच यावेळी मंगला अंगडी यांच्या विजयासाठी सुदर्शन यज्ञसुद्धा करण्यात आला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा हे स्वत: लिंगायत समाजातून येतात. तसेच मंगला अंगडी यासुद्धा लिंगायत समाजाच्या आहेत. यापूर्वी बेळगाव लोकसभा मतदारसंघात लिंगायत विरुद्ध लिंगायत समाजाचा उमेदवार अशी लढत व्हायची. याच कारणामुळे लिंगायत समाजाचे धर्मगुरू कोणत्याही उमेदवाराला थेट पाठिंबा देत नव्हते. ते राजकारण आणि पाठिंब्यापासून स्वत:ला दूर ठेवत. मात्र, यावेळी येदियुरप्पा आणि मंगला अंगडी यांनी तब्बल ७० धर्मगुरुंची भेट घेत मंगला अंगडी यांच्यासाठी पाठिंबा मागितला आहे. या भेटीमुळे बेळगावात राजकीय समीकरणं बदलणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button