बेळगाव पोटनिवडणुक : फडणवीसांच्या प्रयत्नाने पुन्हा भाजप, तर संजय राऊत तोंडघशी

Maharashtra Today

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. . केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके मैदानात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेनेने संपूर्ण ताकद लावली होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोड शो करत शेळकेंच्या विजयाचा दावा केला होता. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी संपूर्ण धुरा आपल्या हाती घेतली होती. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपच्या मंगला अंगडी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे शुभम शेळके थेट तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेले आहे.

आता पर्यंत हाती आलेल्या निकालानुसार मंगला अंगडी यांना १ लाख १६ हजार २९५ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांना १ लाख ५ हजार ७२२ मते मिळाली आहेत. तारण शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या शुभम शेळकेंना केवळ २९ हजार ३१० मते मिळाली आहेत. त्यामुळे बेळगावात पुन्हा भाजपचा खासदार निवडून येण्याची शक्यता बळावली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार शेळके पहिल्या नंबरनवरुन थेट तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेले आहेत.

ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते. याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button