बेळगावात शिवसेनेच्या रुग्णावाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न ; सीमाभागात तणाव

बेळगाव : शहरातील रामलिंग खिंड येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला केला.पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात वाद उफाळला आहे . या हल्ल्यात रुग्णवाहिकेचा बोर्ड तोडण्यात आला आहे. तसेच गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. यावेळी हा प्रकार घडत असताना शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले त्यानंतर कानडी कार्यकर्ते घटनास्थळावरुन पळून गेले.

माहितीनुसार , शेवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कानडी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच या रुग्णवाहिकेचा बोर्डसुद्धा तोडण्यात आला. हल्ला झाल्याचे लक्षात येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना पळवून लावले.

हा प्रकार घडल्यानंतर येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच खडेबाजारचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी सुरु केल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर तसेच शिवसैनिक प्रविण तेजम यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER