नात्यामध्ये भांडणापेक्षा अबोला जास्त धोकादायक

angry-couple

कुठलंही नातं म्हंटलं की त्यात भांडण, अबोला किंवा रुसवा-फुगवा या गोष्टी आल्याचं परंतु एका रिसर्च मध्ये असे समोर आले आहे की, कुठल्याही नात्यात अबोला धरणे हे भांडण करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. विशेषतः नवरा-बायको आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या नात्यात तर हे जास्तातच धोकादायक असल्याचे तज्ञांचे मतं आहे. दोघांच्या खांद्यावर समान भार असेलेलं हे नातं आवश्यक नाही की नेहमी एकाच सरळ रस्त्याने चालावं. जोडप्यांमध्ये जेव्हा वैचारिक असमानता येते त्यावेळी नात्यांची गाडी अडखळते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका रिसर्चमधून या गोष्टीचा खुलासा करण्यात आला आहे की, छोट्या छोट्या गोष्टींवर एकमेकांशी भांडणारी जोडपी इतर जोडप्यांपेक्षा जास्त खुश असतात.

ही बातमी पण वाचा :  अश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..

रिलेशनशिपमध्ये लोकांच्या राहणीमानावरून संशोधकांनी एक सर्वे केला होता. यामध्ये अनेक लोकांना त्यांच्या नात्यांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. यामधून  असं लक्षात आलं की, ज्या जोडप्यांमध्ये भांडणं होतात. ती जोडपी भांडणं न होणाऱ्या जोडप्यांपेक्षा १० टक्क्यांनी जास्त खूश असतात. कारण भांडणं न होणाऱ्या लोकांमधील जास्तीत जास्त लोकं आपल्या पार्टनरपासून अनेक गोष्टी लपवत असतात.

अनेकदा एखाद्या गंभीर विषयाला टाळत राहिल्याने जोडप्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. त्याचबरोबर एकमेकांवरील विश्वास कमी होतो. समस्यांचा सामना केल्याने किंवा त्यावर उपाय केल्यानेच त्यावर तोडगा निघतो. यावर दुर्लक्ष केल्यामुळे नात्यामध्ये फुट पडण्याची शक्यता बळावते.

ही बातमी पण वाचा : मुलं प्रेमात पडल्यावर असे वागतात