बाहेरची असल्याने शेवटच्या क्षणी सिनेमातून काढून टाकले जात असे, रिचा चड्ढाचा गौप्यस्फोट

Richa Chadda

बॉलिवुडमध्ये (Bollywood) नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याला कारण ठरले आहे अभिनेत्री रिचा चड्ढाने (Richa Chadda) केलेले वक्तव्य. रिचाचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा राजकीय विषयावरील सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. तिकीट खिडकीवर प्रेक्षकांना आकर्षित करण्यास हा सिनेमा यशस्वी ठरला नाही. सिनेमापूर्वी सिनेमाबाबत कॉन्ट्रोव्हर्सीही निर्माण करण्यात आली होती, पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. सिनेमा चालत नसला तरी रिचाने नुकत्याच केलेल्या वक्तव्याने मात्र खळबळ माजली आहे.

रिचाने एका मुलाखतीत तिच्या बॉलिवुडमधील प्रवासाबाबत खुलेपणाने चर्चा केली. रिचाने सांगितले, एखादा कलाकार जेव्हा फिल्मी फॅमिली किंवा फिल्मी बॅकग्राऊंडमधून आलेला नसला तर त्याला बॉलिवुडमध्ये यश सोडा, काम मिळवणेही खूप कठिण जाते. पूर्वीही बाहेरच्यांना यश मिळवणे कठिण होते आणि आजही आहे. समजा एखाद्या नव्या कलाकाराने एखादा सिनेमा साईन केला तर कधी कधी तो कलाकार बाहेरचा असल्याने शेवटच्या क्षणी त्याला सिनेमातून काढून एखाद्या वशिल्याने किंवा फिल्मी फॅमिली, बॅकग्राऊंडमधून आलेल्या कलाकाराला काम दिले जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र अशा स्थितीतही राजकुमार राव, अली फजल यांनी यश मिळवले आहे. तुमच्यात क्षमता असेल तर तुम्ही कोणत्या कुटुंबातून आला यामुळे फरक पडत नाही. तुम्हाला जेथे पोहोचायचे असते तेथे तुम्ही पोहोचताच असेही रिचाने या मुलाखतीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER