माझे विजेचे बिल तीन लाखांनी कमी केले; सामान्य जनतेचे काय? भाजप आमदाराचा उद्विग्न सवाल

Ganpat Gaikwad

ठाणे : लॉकडाऊन (Lockdown) काळात वीज वितरण कंपन्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवण्यात आली. विरोधी पक्षासह सामान्य नागरिकांनी अनेक आंदोलनं केल्यानंतरही विज बिल कमी करण्यात आले नाही. मात्र, कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विज बिलातून तीन लाख रुपये कमी करण्यात आले. यावरून गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी महावितरणाचा (MSEDCL ) समाचार घेतला आहे. आमदाराच्या कार्यालयाचे विज बिल कमी होतं, मग सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल का कमी होत नाही? असा प्रश्न गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला.

आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाचे महावितरणाने तब्बल पाच लाख रुपयांचे वीज बिल पाठवले होते. इतकी मोठी रक्कम पाहून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी बिलातून तब्बल तीन लाख रुपये कमी केले. त्यामुळे गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत.

“आमदाराला तुम्ही तीन लाख रुपये कमी करून देत आहात. मग सर्वसामान्य नागरिकांना २००, ४०० किंवा ५०० रुपये का कमी करून देत नाहीत? महावितरणाचा भोंगळ कारभार सर्वांना दिसून येत आहे. आमदाराच्या कार्यालायचे बिल होते म्हणून तत्काळ कारवाई झाली. पण सर्वसामान्यांचे काय?” असा सवाल गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला.

सर्वसामान्य जनता महावितरणाच्या कार्यालयापर्यंत पोहचत नाही. काही नागरिक तिथे पोहचले तर अधिकारी काही तरी हिशेब दाखवतात. जे बिल आलंय ते भरा. मीटरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही नंतर बघू, असं अधिकारी सांगतात. ” असं गणपत गायकवाड म्हणाले. महावितरणाच्या भोंगळ कारभारावर सर्वसामान्य जनता संतापली आहे. काही दिवसांपूर्वी मी माझ्याच कार्यालयात महावितरणाचा कॅम्प लावला होता. लोकांचं वीज बिल कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केल्याचं गणपत गायकवाड यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER